शुक्रवार 30 डिसेंबर 2011

जस्टीन बीबर/बायबर 'मुलुंड'ला !


परवा (ता. 28) मुलुंडच्या 'निर्मल लाईफस्टाईल' मध्ये गेलो होतो. खरेदी मित्रांना करायची होती, माझी आपली विंडो शॉपिंग. आणि तिथे बिग बझार मधे मस्त गंमत पाहायला मिळाली. लहान मुलांच्या विभागात 'बॉइज वेअर' मध्ये चक्क फ्रॉक टांगलेले होते !

"जस्टीन बीबर (किंवा बायबर) त्या मॉलला भेट देणार असेल म्हणून त्यांनी अशी खास मांडणी केली असेल" असं मित्रं बोलत होते. मला समजत नाही, सारखं त्या जस्टीन बीबरला का हे असं तसं बोलतात ?? काय समजतात काय हे त्याला ?
तो काय फ्रॉकसाठी मुलुंडला येईल ? कॅनडातच त्याला भरपूर फ्रॉक मिळतील की !

0 प्रतिक्रिया:

टिप्पणी पोस्ट करा