हा टॉपिक आधी उल्लेखलेल्या 'मराठी विनोद कम्युनिटी' मधलाच. 'प्रशांत' यांनी हा टॉपिक सुरू केला आहे
अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात... अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत.
पहा काही नमुने :
हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात.... आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा इरसाल वेटर तर.....
गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...कसला चांगला लागतोय
या टॉपिक मधे रश्मिन यांनी मस्त नमुने दिले आहेत:
प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं?
उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय
सकाळी.
प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.
सिनेमागृहा बाहेर
प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण! इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!
सकाळी फिरायला निघाला आहात
प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!
प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना! शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!
LOlzzzzzzzzzzzzzzzz
ReplyDeleteVery loud..... :D :D
ReplyDeletesahi aahe rao.
ReplyDeleteadded it to http://www.marathisuchi.com
Check - Add Widget to publish post automatically to marathisuchi.com - free marathi link sharing & marathi blogs aggregator
Sahiye....!!!
ReplyDelete@ मराठीसुची
ReplyDeleteधन्यवाद. आपल्याला ब्लॉग आवडला व स्वत:हून समावेश करून घेतला ही आनंदाची गोष्ट आहे.
@ Maithili
ReplyDeleteथॅंक्स...'मैथिली थिंक्स' वाली मैथिली ताई ! :) :)
हॅलो क्षितिज ,
ReplyDeleteतुमच्या ब्लॉगवर माझे विजेट पाहुन थोडा दचकलोच [ आणि सुखावलो सुद्धा ;) ].
धन्यवाद .
@ सोहम
ReplyDeleteकालच तुमचा ब्लॉग पाहिला आणि नुसत्या 'आमच्या बद्दल' वरुन आवडला. तेव्हा लगेचच विजेट लावलं.
हाहाहा.. मस्तच एकदम. बसमध्ये एखाद्या जाड्या बाईचा पाय आपल्या पायावर पडल्यावर...
ReplyDeleteप्रश्न: सॉरी, लागलं का?
उत्तर: छे! काहीही काय? तसाही हा पाय माझा नाहीये, मित्राचा उधार घेतला आहे....
@संकेत आपटे
ReplyDeleteसॉलिड