इंजिनियरिंग करणारा बन्या सततच्या तणावामुळे वैतागला आणि त्याने सरळ आत्महत्येचा निर्णय घेतला.
तडक त्याने स्टेशन गाठलं आणि रेल्वेरुळात पडला.
दुरून ट्रेनचा आवाज आला. ट्रेन त्याच रुळावरून येत होती.
बन्या ट्रॅक मध्येच होता.
रुळ धडधडू लागले.
ट्रेन आणि बन्या मधलं अंतर कमी होऊ लागलं.
ट्रेन जवळ आली.
.
.
.
.
.
आणि इतक्यात बन्या चटकन उठून बाजूला झाला.
म्हणाला, "नाही च्यायला, उद्या सबमिशन आहे !!"
- - - -
सबमिशन म्हणजे काय असतं ते कळलंच असेल ! सगळ्या इंजिनियरिंग व इतरही कॉलेज मध्ये हा भयाण प्रकार असतो.
सबमिशन्सच्या तारखा नोटीस बोर्ड वर झळकल्या की सगळेजण खडबडून जागे होतात. सेमिस्टरच्या सुरुवातीला मिळालेले, आणि आता घरी धूळ खात पडलेले असाइनमेंट पेपर्स शोधणे सुरू होते. ते सापडल्यावर 'असाइनमेंट्स मिळवायच्या कुठून ?' हा मूलभूत प्रश्न उभा राहतो. वेळेवर असाइनमेंट पूर्ण करणार्या 'चतुर' (पहा: ३ ईडियट्स) विद्यार्थ्यांना मग एखाद्या सेलिब्रिटीचा दर्जा प्राप्त होतो. जो तो या मुलांना कॉलेज मध्ये शोधत असतो. या सेलिब्रिटिंकडून असाइनमेंट्स मिळवाव्या लागतात. त्या मिळवण्यासाठी अंगी कौशल्य असावे लागते. कारण आपण वर्षभर त्यांच्या काढ्लेल्या खोड्या त्यांना ज्ञात असतात. त्यामुळे 'हे सदगुरू, मी तुझ्या चरणी लीन झालो आहे. तुझ्याशिवाय माझा तारणहार कुणीच नाही' असा भाव चेहेरी ठेवून त्यांच्याशी बोलावे लागते. 'अडला हरी...' चा भाव बाळगून बोलले तर सेलिब्रिटी रागवतात व असाइनमेंट मिळत नाहीत.
असाइनमेंट मिळाल्यावर मात्र त्या पटापट पूर्ण कराव्या लागतात. प्राध्यापक चाणाक्ष असल्याने सेलिब्रिटी व आपल्या असाइनमेंट्स मधील साम्य त्यांना लक्षात येऊ शकते. त्यमुळे थोडा छापखाना व थोडे आपले डोके असे मिश्रण वापरावे लागते.
सगळे जण कागदं खरडत बसल्याची विलोभनीय दृश्य कॅंपसवर दिसू लागतात. एकवेळ खरा सेलिब्रिटी कॉलेज मधे आला तरी, "कॅटरीना ना ? मरु दे तिकडे, माझी सोळावी असाइनमेंट राहिलीये" असे उद्गार ऐकू येण्याचीही शक्यता असते.
अशी भरपूर मेहेनत घेऊन तयार केलेली फाइल सबमिशनच्या शेवटच्या तारखेला प्रोफेसरच्या डेस्क वर टेकवली म्हणजे कसं अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं !
आमच्या कॉलेज मधलं सबमिशनही नुकतंच आटोपलं आणि आम्ही सगळ्यांनी 'हुश्श' केलं...
आटोपलं??? Otherwise ज्युनिअर्स ना लावायचं ना कामाला :D
ReplyDeleteहो रे क्षितिज,
ReplyDeleteहा इंजिनियरींगचा अलिखीत नियम आहे ! आम्ही जे केल तेच आमचे विद्यार्थी पण करतात ! आज आमची फक्त जागा बदलली आहे इतकच, आम्ही टेबलच्या दुसर्या बाजूला आहोत. पण सर्व प्रकार तेच आहेत. हुश्श मात्र आम्ही पण करतो.
तुला अजुन काही नियम हवे असतील तर सांगतो मला ई-मेल कर !!!
अजय.
@ ♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........
ReplyDeleteत्यांना जरा फर्स्ट सेमला कॉलेजची मजा अनुभवू दे.
दुसरी सेम आहेच बाकी. :)
@ अजय
ReplyDeleteहो, आमच्या गचाळ अक्षरात लिहिलेली बाडं तपासायची म्हणजे प्रोफेसर्सना तापच होत असेल. :)