नाही, शीर्षक चुकून दिलेलं नाही. हे खरं आहे. एका पक्षाच्या बोर्डावर 'देशव्यापी भारत बंद' असं लिहिलेलं पाहिलं. म्हणजे इतर वेळचा भारत बंद कसा असतो ? हे म्हणजे 'अख्खा मुंबई में वर्ल्डफेमस' सारखं झालं. पण बरीच लोकं बोलताना असे भलते शब्द प्रयोग वापरत असतात. एक प्रसिद्ध शब्द प्रयोग म्हणजे 'बॅडलक खराब आहे यार !'
"एका सेकंदासाठी गाडी गेली रे ! माझं बॅडलकच खराब आहे" असं एक मित्र म्हणत होता. आता 'बॅडलक' खराब असेल तर त्याचं लक चांगलं आहे असाच अर्थ झाला ना ?
तसं लहान मुलांच्या लेखी वाढदिवस कायम हॅपी असतो.
"अरे वा ! चॉकलेट कशाबद्दल ?"
"आज माझा हॅपी बड्डे आहे ना, म्हणून" असं ते सहज म्हणून जातात.
बरोबर आहे, मोठी माणसं वाढदिवस वेन्जॉय करायचं सोडून नसत्या विचारात गुंतलेली असतात. (आपली शिरिन बघा, वाढदिवसाला म्हणते "आपण एक वर्ष मोठे झालो याचा आनंद साजरा करायचा की आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं म्हणून दु:ख करायचं ?" )
वाढदिवसावरनंच आठवलं, भारत बंद वाल्या एका बोर्डावर लिहिलं होतं 'पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ भारत बंद !'
पेट्रोल वाढलं तर वाढू द्या की, फक्त त्याचे दर कमी करा ! तसंही, पेट्रोल वाढलं तर दर कमी होतील का ? सप्लाय अँड डिमांड असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे :)

No comments:
Post a Comment