Thursday, 18 June 2009

सुटलो चला !

व्वा !! आज कधी नव्हे ते दहावीच्या रिझल्ट ची तारीख जाहीर केली. ( २५ जून आहे बरं का ).या वाक्यात दडलेला 'व्वा' चा सुप्त अर्थ दहावी दिलेल्यांनाच माहीत. कुठेही, कोणतहि माणूस भेटला की त्याच्या तोंडी एकच प्रश्न असायचा "काय मग रिझल्ट कधी आहे ?" याशिवाय दोन प्रश्न म्हणजे "किती पडतील ?" (मार्क हो! ) आणि "पुढे काय करणार ?"
एकदा असाच रस्त्यात एक ओळखीचा मनुष्य भेटला . आता दहावी दिलेल्या मुलाला प्रश्न विचारल्याशिवाय तर सोडत नाहीच कुणी. त्याने विचारलं,
"काय करणार मग पुढे ?"
"आता घरी जाणार, जेवणार, अणि झोपणार"
"तसं नव्हे रे , दहावीनंतर पुढे काय करणार ?"
"कॉलेज !!"

चला आता रिझल्ट ची तारीख जाहीर झाल्याने एक प्रश्न कमी झाला. २५ जून रोजी "किती टक्के पडतील ?" हा पश्न कमी होईल . आणि admission झाल्यावर मग 'पुढे काय करणार' हा प्रश्नही थांबेल .

4 comments: