Saturday, 30 May 2009

मूर्तिमंत भीती उभी !


बिल गेट्स म्हणे पक्ष्यांना फार भितो. मला तर हे खरं वाटत नव्हतं. म्हणून मी त्याचा छडा लावायचा ठरवला. आणि ते खरं निघलं की हो ! त्याचं झालं काय की,

बिल गेट्स मध्यंतरी महाराष्ट्र दौ-यावर आला होता. त्याला इथल्या शाळांतील संगणक शिक्षणात काय काय प्रगती झाली आहे हे पाहायच होतं. आपल्याकडील टूर गाइडही फार बुद्धिमान. आता त्या बिल गेट्स ला कंप्यूटर लॅब्स दाखवून मोकळं करायच सोडून त्याला शाळेतलं स्नेहसांमेलन पाहण्याचा आग्रह केला. बिल तयार झाला.
आणि तिकडे त्या शाळेत ती लहान मुलं "किल बिल किल बिल पक्षी बोलती" या गाण्यावर नृत्य करत होती. इकडचे पक्षी बिल ला 'किल' करायची सूचना देतात हे पाहून बिल गेट्स पक्का घाबरला. तेव्हापासून त्याच्या मनात पक्ष्यांबद्दल फार भीती आहे !

3 comments:

  1. kill Bill ha chitrapat baghun to striyanahi ghabarato mhane.... hahahahahh

    khupach chaan...

    ReplyDelete
  2. योग यांस : मन:पूर्वक धन्यवाद !

    विजय देशमुख यांस : म्हणजे मला नक्की कळलेनही काय ते . (तो चित्रपट पहिला नही ना अजुन !)

    ReplyDelete