ते दोघे लहानपणापासून चे मित्र होते. 'ते' म्हणजे राजू आणि विजू. एकत्र अभ्यास केला......एकत्र नापास झाले.....आपापल्या घरी एकाच वेळी ओरडा खाल्ला....मग एकत्र मन लावून अभ्यास केला.....एकत्र पास झाले. दोघांना अभ्यासाची गोडी लागली. दोघांना चांगले मार्क्स पडू लागले. ही मुले दहावीत नाव काढणार असं सगळे म्हणू लागले. आणि तसच झालं दोघांनाही चांगले टक्के पडले. साहजिकच शास्त्र शाखेकडे दोघे वळले. इथपासून दोघांचे मार्ग भिन्न होवू लागले. राजू ला आवड होती गणिताची....तर विजू जीवशास्त्रात रमे.
त्यामुळे राजू ने बारावीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर विजू ने वैद्यकिय महाविद्यालयात. तरीही मैत्री काही तोडली नाही. यथावकाश त्यांनी आपापले अभ्यासक्रम पूर्ण केले.
दरम्यान त्यांच्या परिसरात एक तरुणी राहायला आली. लहान पणापासून सगळ्या गोष्टींचा एकत्र अनुभव घेतलेल्या राजू आणि विजू ला तिच्या प्रेमात पडायला वेळ लागला नाही. दोघांनाही तीच तरुणी आवडायची. दोघांनी तिच्याशी मैत्री केली. आता मात्र ते दोघे मित्र राहीले नाहीत. नेहमी एकीमेकांवर मात कशी करता येईल हे ते बघत.एकदा काही कामानिमित्त राजू ला आठवडाभर बाहेर जायचे होते. तर त्याने त्या तरुणीला चक्क सात सफरचंद दिले आणि गेला.
वाचक हो, कोणी कल्पना करू शकेल असं अचाट गिफ्ट त्याने का दिलं असावं ?
अहो, विजू ला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी ! AN APPLE A DAY, KEEPS DOCTOR AWAY !!!
मस्त होता. सर्वात भारी बिलगेट्स वाला. चालु राहु द्या.
ReplyDeleteधन्यवाद साधक !! आपल्या सारख्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येणं समाधानाची गोष्ट आहे.
ReplyDelete