Monday, 25 January 2010

हॅपी प्रजासत्ताक दिन



"बाळा, उठ, सहा वाजले"
"नको ना आई. झोपू दे. नाहीतरी आज स्वातंत्र्य दिन आहे. मला स्वातंत्र्य दे झोपण्याचं"
"अरे गाढवा, स्वातंत्र्य नाही, प्रजासत्ताक दिन आहे"
"तेच ते......झोपू दे मला"
"झोपू दे काय ? मग शाळेत कोण जाणार झेंडवंदनाला ?"
"मी नाही जाणार, मला कंटाळा येतो"
"अरे, कंटाळा कसला त्यात ?"
"हो....मला सगळी मुलं चिडवतात"
"अरे, मुलंच आहेत ती...चिडवणारच"
"नाही, मी नाही जाणार !"
"जाणार नाही काय ? किती विचित्र दिसेल ते ?"
"काही विचित्र वाटत नाही हां"
" नाहीतर काय.....झेंडवंदनाला मुख्याध्यापक गैरहजर आहेत दिसल्यावर गोंधळ नाही का होणार !!!"


सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !!! जय हिंद !!

2 comments:

  1. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. @ Suhas Zele
    माफ करा, उशिरा प्रतिक्रिया देतोय.
    थॅंक्स. बाकी आता 'सेम टू यू' म्हणता येणार नाही तेव्हा, येणार्‍या स्वातंत्र्यदिनाच्या Advance शुभेच्छा !

    ReplyDelete