शीर्षक बघून गोंधळण्याचं काही कारण नाही. 'I am back' चं संदर्भहीन भाषांतर आहे हे. सध्या बरीच संदर्भहीन राजकीय भाषणे आणि टीका-टिपण्णी ऐकावी लागत असल्यामुळे तसंच भाषांतर केलं.
तर सांगायचा मुद्दा हा, की मी ब्लॉगवर परतलोय ! साधारण दोन वर्षांनी. तसंही लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारांची आठवण पाच वर्षांनी होते, त्या तुलनेत मला फार लवकर आठवण आली ब्लॉगची :D
तसं आठवण यायचीच सारखी, पण आज लिहू - नंतर लिहू म्हणून राहून जायचं.
एखाद्या 'ट्रिगर' ची गरज होती ;) आणि मागच्याच महिन्यात 'ट्रिगर' ओढला गेला.
आमच्या शहरातल्या थेटरात 'फॅंड्री' पाहायला गेलो होतो. रात्रीचा खेळ. शो संपल्यावर जिना उतरून बाहेर येताना पाठीवर थाप पडली. वळून पाहिलं तर, 'वटवट सत्यवान' ब्लॉगच्या वॉलपेपर वरचा चेहरा समोर ! समोर खरोखरीच हेरंब दादा उभा होता. सातासमुद्रा पलिकडून थेट 'टिळक' टॉकिजात.
(दादा देखील डोंबिवलीत पाठ आहे.)
त्याचाशी बोलताना जाणवलं की कित्ती दिवस झाले ब्लॉगवर काही लिहिलंच नाही आपण !
सो फायनली आज, ब्लॉगवर मी पाठ आहे.

Haha.. aatta baghitali hi post. Barr zal paath zalas te. Aata mi kadhi paath hotoy baghu :)
ReplyDelete:) ऑल द बेस्ट !
Delete