खो.टा. प्रतिनिधी, मुंबई
निवडणूक प्रचारात सिनेकलावंतांना पाहण्याची सवय मतदारांना झालेली आहे. मात्र काही पक्ष प्रचारासाठी हटके आयडिया लढवत आहेत.
'तेलकट वडे - चिकन सूप' च्या आरोपांनी व्यथित झालेल्या सेना नेतृत्वाने या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी डाएट एक्स्पर्ट ऋजुता दिवेकर यांना पाचारण केल्याची चर्चा आहे. 'आम्ही फुकाचे आरोप करत नाही. म्हणून या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला आमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे' असा दावा कार्यकर्त्यांनी खासगीत केला.
मात्र सेनेवर मात करण्यासाठी कॉंग्रेसने देखील ऋजुता दिवेकर यांना प्रचारार्थ बोलावले असल्याचे समजते. 'विरोधी पक्ष आज अन्नाचा मुद्दा काढत असले तरी मुळात अन्नसुरक्षा कायदा आम्ही आणला.' असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्यांनी केले. अन्नसुरक्षा कायदा व महिला सबलीकरण हे मुद्दे कॉंग्रेससाठी निवडणुकीत महत्वाचे आहेत. ऋजुता दिवेकर आहारतज्ञ आहेत, तसेच त्या स्वत: स्वतंत्र सक्षम महिला आहेत त्यामुळे कॉंग्रेससाठी त्यांचा चेहरा योग्य ठरेल, असा विश्वास कॉंग्रेस धुरिणींना वाटत आहे.
त्याच दरम्यान 'आप'नेही त्यांनाच प्रचारात बोलावण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे वृत्त आहे. 'उन्हाळा हा आंब्यांचा सीझन. चांगल्या आरोग्यासाठी सीझननुसार फळे खावीत, असे ऋजुता दिवेकर म्हणतात. आमच्या पक्षाच्या नावातच 'आम' आसल्याने त्यांनी आमच्या पक्षाच्या प्रचाराला यावे अशी विनंती आम्ही करणार आहोत.' असे एका आम आदमीने सांगितले.
या संबंधात खो.टा. प्रतिनीधींनी वारंवार प्रयत्न करूनही दिवेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

No comments:
Post a Comment