Tuesday, 28 March 2017

शालिवाहन शके १९३९ च्या प्रारंभानिमित्त

ब्लॉग वर २०१६ मध्ये एकही पोस्ट टाकली नाही हा साक्षात्कार झाला.
निदान ह्या वर्षी एखादी पोस्ट टाकून ब्लॉग जिवंत ठेवण्याचा विचार केला आणि म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी ही फेसबुकवरची रिपीट पोस्ट.

नेहमीचे 'चैत्राची सोनेरी पहाट..', 'तीन व्यक्ती तुमचा नंबर मागत होत्या..', 'नवे वर्ष, नवी आशा..' हे मेसेज वाचायचं टाळलं. पण 'आपले सण, आपले उस्तव' वाचून ही उस्तवारी कोणी केली असा प्रश्न पडला.

असे गुढी पाडव्याचे गुडी गुडी मेसेज फार फिरत असताना, काही संघटनांकडून पसरवला गेलेला एक तिखटजाळ मेसेजही या वर्षी घुसतो आहे. साडी, पालथ्या तांब्या कसा अशुभ आणि भगवा झेंडा, सुलटा तांब्याचा फोटोशॉप केलेला फोटो कसा शुभ हे सांगणारा.

त्यावर कहर म्हणजे आमच्या शहरात मनसेनं स्वतःचा झेंडाच गुढीला लावला. अमुक एक परंपरा आपल्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचा कसानुसा प्रयत्न.

पाडव्याच्या दिवशी या सर्वांना, पाडगावकरांनी सांगितलेला 'सलाम' !

Saturday, 31 January 2015

मितवा, तू कढई

या आठवड्याचा नवीन मराठी चित्रपट
Thursday, 19 June 2014

डायलॉगबाजी

परवा बाजारातून दोन जड पिशव्या घेऊन घराजवळ आलो. खालीच बिल्डींगचा वॉचमन उभा होता. म्हटलं त्याची मदत घेऊ पिशव्या वर न्यायला.

त्याला विचारलं, एक काम करोगे मेरा ?
तो डायलॉगबाजी करत हसत म्हणाला, हम काम सिर्फ पैसों के लिए करते है !
मी: कितने चाहिए ?
वॉचमन: काम क्या है ?
मी: 'बहादूर' हो तो इसकी फिक्र क्‍यू करते हो !

Wednesday, 16 April 2014

आम्ही मोदी, जीना आणणार आहे !

एक जाहिरात पहिली टीव्हीवर. मराठी चॅनेल सुरू होता. मी होतो दुसर्‍या खोलीत.
जाहिरातीत गाणं वाजायला लागलं, "आम्ही मोदी, जीना आणणार आहे"
मी अवाक् !


मोदी-जीना ? ही जोडी कशी बरं जमवली ?
मोदी-पटेल एक वेळ पटेल.
मोदी-गांधी सुद्धा चालू शकेल.
अगदी मोदी-नेहरू सुद्धा चालवून घेता येईल. (दि फर्श्ट पीएम अँड दि नेक्श्ट पीएम)
पण मोदी-जीना ?

दुसर्‍या दिवशी तीच जाहिरात हिंदी चॅनेलवर पहिली,  "हम मोदीजी को लानेवाले है"
तेव्हा कोडं उलगडलं. 'मोदीजी' आहे तर !
#lame puns