Wednesday 16 December 2009

प्रत्युत्तर

आज जवळपास तीस वर्षानंतर अमिताभ कड़े शशि कपूर ला द्यायला उत्तर आहे. तो आज शशि कपूर ला प्रत्युत्तर देऊ शकतो......



"अगर तुम्हारे पास माँ है..........






तो मेरे पास 'पा' है !!!"

Thursday 27 August 2009

डोकेदुखी...

एका साहित्यिकाने डॉक्टरेट मिळवली खरी.....पण घराबाहेर 'डॉ.....' अशी पाटी लावल्या पासून त्याला डोकेदुखी सुरु झाली. अनेक जण येउन त्याला वैद्यकीय उपचार विचारत.
असंच एके दिवशी एक गृहस्थ आले.
"अहो, हल्ली माझं डोकं फार दुखतं हो"
"हे पहा, मी मेडिकल डॉक्टर नाही....मी साहित्यात पीएचडी केली आहे" - साहित्यिक त्रासून म्हणाला.
"अहो मग तेच सांगायचं आहे. तुमचे लेख वाचले की डोकं फार दुखतं बघा !"

Thursday 18 June 2009

सुटलो चला !

व्वा !! आज कधी नव्हे ते दहावीच्या रिझल्ट ची तारीख जाहीर केली. ( २५ जून आहे बरं का ).या वाक्यात दडलेला 'व्वा' चा सुप्त अर्थ दहावी दिलेल्यांनाच माहीत. कुठेही, कोणतहि माणूस भेटला की त्याच्या तोंडी एकच प्रश्न असायचा "काय मग रिझल्ट कधी आहे ?" याशिवाय दोन प्रश्न म्हणजे "किती पडतील ?" (मार्क हो! ) आणि "पुढे काय करणार ?"
एकदा असाच रस्त्यात एक ओळखीचा मनुष्य भेटला . आता दहावी दिलेल्या मुलाला प्रश्न विचारल्याशिवाय तर सोडत नाहीच कुणी. त्याने विचारलं,
"काय करणार मग पुढे ?"
"आता घरी जाणार, जेवणार, अणि झोपणार"
"तसं नव्हे रे , दहावीनंतर पुढे काय करणार ?"
"कॉलेज !!"

चला आता रिझल्ट ची तारीख जाहीर झाल्याने एक प्रश्न कमी झाला. २५ जून रोजी "किती टक्के पडतील ?" हा पश्न कमी होईल . आणि admission झाल्यावर मग 'पुढे काय करणार' हा प्रश्नही थांबेल .

Saturday 30 May 2009

मूर्तिमंत भीती उभी !


बिल गेट्स म्हणे पक्ष्यांना फार भितो. मला तर हे खरं वाटत नव्हतं. म्हणून मी त्याचा छडा लावायचा ठरवला. आणि ते खरं निघलं की हो ! त्याचं झालं काय की,

बिल गेट्स मध्यंतरी महाराष्ट्र दौ-यावर आला होता. त्याला इथल्या शाळांतील संगणक शिक्षणात काय काय प्रगती झाली आहे हे पाहायच होतं. आपल्याकडील टूर गाइडही फार बुद्धिमान. आता त्या बिल गेट्स ला कंप्यूटर लॅब्स दाखवून मोकळं करायच सोडून त्याला शाळेतलं स्नेहसांमेलन पाहण्याचा आग्रह केला. बिल तयार झाला.
आणि तिकडे त्या शाळेत ती लहान मुलं "किल बिल किल बिल पक्षी बोलती" या गाण्यावर नृत्य करत होती. इकडचे पक्षी बिल ला 'किल' करायची सूचना देतात हे पाहून बिल गेट्स पक्का घाबरला. तेव्हापासून त्याच्या मनात पक्ष्यांबद्दल फार भीती आहे !

Wednesday 11 February 2009

पत्र

प्रिय उत्साही वाचक,

मागच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आणि या पोस्ट मध्ये बर्‍याच काळाचं अंतर आहे.
त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमची दहावी. खरं तर २६ नोवेंबर च्या हल्ल्यानंतर ब्लॉगवर हास्यात्मक काही लिहायचा मूड नव्हता. त्यानंतर भारतात विविध नेत्यांचा जो लाइव्ह कॉमेडी शो सुरू होता त्याला तोड नव्हती. आणि अभ्यास हे तर ब्लॉग न लिहीण्याचं महत्वाचं कारण आहे.
अभ्यासाचा विचार करताना एक विचार सुचला.


अभ्यासाची परिसीमा काय ?
बोर्डाच्या परीक्षेला रजा घेऊन घरी अभ्यास करत बसणे !!!

( हा विनोद होता त्यामुळे गरजूंनी हसावे. परीक्षेच्या करणाने पुढील विनोद २० मार्च
नंतर नोंदवण्यात येईल याची नोंद घ्यावी.)

हसावे--नव्हे--कळावे,
(२० मार्च नंतर) आपलाच,
क्षितिज मदन देसाई