Monday, 30 October 2017

फाफेचा कानमंत्र

ट्रॅफिक पोलीस:  ए, वन-वे आहे पुढं. मागे वळवून घे बाईक.
मी:  मागे वळणं खूप सोपं आहे, पण पुढे जाणं गरजेचं आहे!
ट्रॅफिक पोलीस:  पावतीच बनवतो तुझी, थांब


Saturday, 29 April 2017

श्रीदेवीचा आगामी चित्रपट

नावात एक अक्षर जोडून सिनेमाची कल्पना बदलण्याचा एक गमतीशीर खेळ असतो.
Add a letter to a movie title, what is the new plot ?
श्रीदेवीच्या आगामी चित्रपटाचं तसं पोस्टर बनवून पाहिलं
😁


Tuesday, 28 March 2017

शालिवाहन शके १९३९ च्या प्रारंभानिमित्त

ब्लॉग वर २०१६ मध्ये एकही पोस्ट टाकली नाही हा साक्षात्कार झाला.
निदान ह्या वर्षी एखादी पोस्ट टाकून ब्लॉग जिवंत ठेवण्याचा विचार केला आणि म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी ही फेसबुकवरची रिपीट पोस्ट.

नेहमीचे 'चैत्राची सोनेरी पहाट..', 'तीन व्यक्ती तुमचा नंबर मागत होत्या..', 'नवे वर्ष, नवी आशा..' हे मेसेज वाचायचं टाळलं. पण 'आपले सण, आपले उस्तव' वाचून ही उस्तवारी कोणी केली असा प्रश्न पडला.

असे गुढी पाडव्याचे गुडी गुडी मेसेज फार फिरत असताना, काही संघटनांकडून पसरवला गेलेला एक तिखटजाळ मेसेजही या वर्षी घुसतो आहे. साडी, पालथ्या तांब्या कसा अशुभ आणि भगवा झेंडा, सुलटा तांब्याचा फोटोशॉप केलेला फोटो कसा शुभ हे सांगणारा.

त्यावर कहर म्हणजे आमच्या शहरात मनसेनं स्वतःचा झेंडाच गुढीला लावला. अमुक एक परंपरा आपल्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचा कसानुसा प्रयत्न.

पाडव्याच्या दिवशी या सर्वांना, पाडगावकरांनी सांगितलेला 'सलाम' !