Friday, 1 June 2012

'देशव्यापी' भारत बंद

नाही, शीर्षक चुकून दिलेलं नाही. हे खरं आहे. एका पक्षाच्या बोर्डावर 'देशव्यापी भारत बंद' असं लिहिलेलं पाहिलं. म्हणजे इतर वेळचा भारत बंद कसा असतो ? हे म्हणजे 'अख्खा मुंबई में वर्ल्डफेमस' सारखं झालं. पण बरीच लोकं बोलताना असे भलते शब्द प्रयोग वापरत असतात. एक प्रसिद्ध शब्द प्रयोग म्हणजे 'बॅडलक खराब आहे यार !'
"एका सेकंदासाठी गाडी गेली रे ! माझं बॅडलकच खराब आहे" असं एक मित्र म्हणत होता. आता 'बॅडलक' खराब असेल तर त्याचं लक चांगलं आहे असाच अर्थ झाला ना ?
तसं लहान मुलांच्या लेखी वाढदिवस कायम हॅपी असतो.
"अरे वा ! चॉकलेट कशाबद्दल ?"
"आज माझा हॅपी बड्डे आहे ना, म्हणून" असं ते सहज म्हणून जातात.
बरोबर आहे, मोठी माणसं वाढदिवस वेन्जॉय करायचं सोडून नसत्या विचारात गुंतलेली असतात. (आपली शिरिन बघा, वाढदिवसाला म्हणते "आपण एक वर्ष मोठे झालो याचा आनंद साजरा करायचा की आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं म्हणून दु:ख करायचं ?"  )
वाढदिवसावरनंच आठवलं, भारत बंद वाल्या एका बोर्डावर लिहिलं होतं 'पेट्रोल वाढीच्या निषेधार्थ भारत बंद !'
पेट्रोल वाढलं तर वाढू द्या की, फक्त त्याचे दर कमी करा ! तसंही, पेट्रोल वाढलं तर दर कमी होतील का ? सप्लाय अँड डिमांड असं काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तज्ञानी कृपया मार्गदर्शन करावे :)

Monday, 16 January 2012

जादू


फेसबुकवर दोन प्रख्यात व्यक्तींचा एकत्र फोटो मिळाला.
मग काय, फोटोशॉप मध्ये थोडी मजा केली !

Friday, 2 December 2011

नक्की काय ?

ह्या मुलींच्या मनात नक्की काय असतं ?
नेमका प्रॉब्लेम काय असतो ?

जेव्हा मुलगा विचारतो,
"अगर मैं कहूँ, मुझे तुमसे मोहब्बत है
मेरी बस यही चाहत है, तो क्या कहोगी"

तेव्हा मुलगी म्हणते,
"इस बात को अगर तुम
ज़रा और सज़ा के कहते,
ज़रा घुमा-फिरा के कहते,
तो अच्छा होता"

(सौजन्य: 'लक्ष्य' चित्रपट)


पण जेव्हा तो सांगतो,
"झटक कर ज़ुल्फ जब तुम तौलिए से बारिशें आज़ाद करती हो
अच्छा लगता है
हिला कर होंठ जब भी हौले हौले गुफ्तगू को साज़ करती हो
अच्छा लगता है"

तेव्हा मात्र ती म्हणते,
"ज़रा शॉर्ट में बतलाओ ना, सीधे पॉइंट पे आओ ना"


(सौजन्य: 'आरक्षण' चित्रपट)

त्यांना नक्की काय अपेक्षित असतं ?

(जाता जाता : या दोन्ही गाण्यांना शंकर-एहसान-लॉय यांचंच संगीत आहे !)

Saturday, 23 July 2011

विजेता कोण ?

एकदा टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत गप्पा मारत असतात.
त्यांच्यात स्पर्धा लागते - प्रत्येकाने जास्तीत जास्त लांब प्रवास करायचा.
जॅकी अख्खी पृथ्वी पालथी घालतो ! (फक्त ८० दिवसात)
टॉम तर चंद्रावर जातो !!
आणि आपला रजनी, चक्क मंगळावर पोहोचतो !!!
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त,

"आओ रजनी वा, बहुत थके हुए लग रहे हो !"
मंगळावर (हाताची घडी घालून उभा असलेला) गोविंद तिवारी त्याची विचारपूस करतो...