Sunday 27 June 2010

माझी कथा लोकसत्तात !

पोस्ट खरं तर 'हास्यब्लॉग' वर लिहिण्यासारखी नाही...म्हणजे विनोदी वगैरे नाही ('नेहमी लिहितोस ते काय फार विनोदी वाटतं काय ?' असं मनात म्हणलात ते कळलं बरं का ! ) . पण माझ्याकडे दुसरा दैनंदिनी-ब्लॉग नाही म्हणून इथे लिहीत आहे.

माझी 'भेट!'.ही धक्कांतिका आजच्या लोकसत्तात प्रकाशित झाली. लोकरंग पुरवणित 'गोष्ट' या सदरात.

ही कथा मी पाच मार्च ला पाठवली होती. नंतर अनेक रविवार वाट बघितली पण 'भेट' झालीच नाही. मला वाटलं एक तर ती पोहोचली नसेल नाहीतर त्यांना आवडली नसेल. आणि त्यांनी कथा स्वीकारली का नाही हे कळायला पण मार्ग नव्हता. कारण मी माझा जुना horizondesai@gmail.com' हा आयडी दिला होता. तो आता बंद आहे. (ते सुद्धा फाजील पणामुळे. त्या आयडिवर माझं दुसरं गूगल अकाउंट मर्ज करण्यासाठी आधी तो डिलीट केला. आणि नंतर त्याच नावाने साइन अप करताना कळलं की गूगल ईमेल आयडी रिसायकल करत नाही ! :( )

तर ती कथा आज प्रकाशित झाली. त्याला साजेसं सुंदर चित्रही छापलं आहे.



12 comments:

  1. भुत्या भाऊ! आता तु कोणत्या मानसोपचारवाल्याकडे जाणार रे? ...चांगली लिहीलीस कथा.

    ReplyDelete
  2. क्षितीज, छान आहे कथा.. आवडली.

    ReplyDelete
  3. कहानी मे ट्विस्ट... छानच आहे

    ReplyDelete
  4. अभिनंदन रे... कथा पण मस्तच आहे..

    ReplyDelete
  5. @यशवंत कुलकर्णी
    :) आता डॉक्टरांना राजीनामा द्यावा लागेल कदाचित !

    ReplyDelete
  6. @दवबिन्दु
    धन्यवाद..:)

    ReplyDelete
  7. khupacha shan aahe .................

    ReplyDelete