Sunday 14 October 2012

ती येतेच !


कितीही वेळा मनाशी ठरवलं की तिला नकार द्यायचा, या वेळेस तरी 'नाही' म्हणायचं, तरी प्रत्यक्षात तसं म्हणता येत नाही. ती येतेच. येते आणि वाहवत नेते मला तिच्यासोबत.
किती नुकसान करून घेतलं आहे तिच्यामुळे  मी स्वत:चं !
आईला सुद्धा माहीत आहे तिच्या बद्दल सगळं. ती म्हणते , 'तुला अभ्यास आहे एवढा, बाकीची कामं आहेत.. तरी सगळं सोडून पुन्हा तिच्या नादी का लागतोस तू ?'
मला पण पटतं हे. मनाशी ठरवतो, बस झालं ! आता  यापुढे ठामपणे नकार द्यायचा तिला. पण ती येतेच. नेहमी प्रमाणे येते आणि अशी काही जादू करते की नकार विरघळून जातो तिच्यात.
काय आहे, मनाशी कितीही वेळा ठरवलं ना, तरी शरीर प्रत्येक वेळेस होकार देतं. मनाचे बंध झुगारून शरीर तिच्याकडे धाव घेतं. म्हणूनच ती येते.
आजही ती आली होती..
ती म्हणजे 'रविवार दुपारची झोप' :D :D :D
म्हटलेलं रविवार आहे तर सगळ्या असाइनमेंट्स लिहून काढूया, पण कसलं काय ! जेवण झाल्यावर जी ताणून दिली दुपारी, की पाच वाजता उठलो.
त्यातल्या त्यात एक बरं झालं, 'तिच्या' निमित्ताने ब्लॉग वरची धूळ झटकून नवीन पोस्ट तर आली :)

3 comments:

  1. हा , हा, हा, जबर चिकन हादडून रविवारची दुपारची झोप मला पण प्रिय आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, झोपेचं मुख्य कारण लिहायचं रहिलं.. तुडुंब पोट भरल्यावरच ती येते ;)

      Delete
  2. प्रकल्पाकरिता शुभेच्छा !

    ReplyDelete