Sunday, 12 October 2008

हास्यारंभ...

"आहेत चिंता आयुष्यात फार,
म्हणून कंटाळून जाउ नका,
हलका कराया भार थोडा,
हास्यारंभ करू चला !"

ही वाक्ये कोणाची आहेत हे आठवण्यासाठी बुद्धीला ताण देऊ नका. ही वाक्ये माझीच आहेत. पण अवतारणात आणि तिरके वगैरे केल्या शिवाय ही कविता (?) तुम्ही वाचली नसती.
या हास्यब्लॉग वर आपले स्वागत आहे. या ब्लॉगवर असतील विनोद, लेख, व्यंग चित्रे, विडंबन किंवा विनोदी पुस्तकांचा परिचय किंवा असच काही. मात्र जे काही असेल ते हास्यंबंधित (हास्य + संबंधित) असेल. तुम्ही या हास्यब्लॉग वर ई-हसू शकता.
तर तुमचा फार वेळ घेत नाही. लवकरच भेटू...

6 comments:

 1. नवीन ब्लॉग साठी अनेक शुभेच्छा

  ReplyDelete
 2. सही आहे. शुभेच्छा!

  एक अनाहूत सल्ला - मार्चपर्यंत थोडंसं अभ्यासाकडेही बघ. :)

  ReplyDelete
 3. कंच्याबी ब्लागाच्या पहिल्या लेखावर पर्तिक्रिया द्यायची ही आपली सवय. म्हनून हितंबी पर्तिक्रिया द्येतो. शुबेच्छा बरं का.. :-)

  ReplyDelete
 4. @अमोल केळकर
  धन्यवाद !
  सॉरी, मी भयंकर उशीरा रिप्लाय देतोय.

  ReplyDelete
 5. @अनिकेत
  धन्यवाद.
  तुम्हालाही कैच्यकै उशिरा रिप्लाय देतोय. दहावीचे पेपर चांगले गेले :)

  ReplyDelete
 6. @संकेत आपटे
  खूप खूप थान्कू :)

  ReplyDelete