
सॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !
आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !
बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"
बरोबर ना ?