Saturday, 15 May 2010

फाजिती

हा ब्लॉग सुरू केला तेव्हा उत्साहाने ब्लॉगवर साइट काउंटर टाकले होते. अर्थात फ्री काउंटर असल्याने त्या काउंटर देणार्‍या साईट ची लिंक त्याला होती. पण तेव्हा असलेल्या HTML च्या थोड्याफार माहितीवरून त्या कोड मधे काडी करून ती लिंक मी काढून टाकली. म्हटलं कोणाच्या तातश्रींना कळतंय ?

मग प्रत्येक पोस्ट नंतर काउंटर वर वाढत जाणार्‍या संख्येकडे पाहायला अभिमान वाटायचा. आपलं लिखाण (खूपच पांचट असूनही) कोणीतरी वाचतय ही गोष्ट मनाला सुखवायची. त्या काउंटर चा 'अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा' होताना पाहायची उत्सुकता होती.

आणि एके दिवशी घात झाला. फ्री काउंटरवाल्यांना कसे कोण जाणे माझी लबाडी समजली. त्या दुर्दैवी सकाळी ब्लॉग पहिला तर काउंटर दिसेना. त्या जागी Account Suspended. No Link Found असा रूक्ष मेसेज !

मग आज परत काउंटर लावायचा ठरवलाय. ब्लॉग वर अतपर्यंतच्या नोंदी आहेत १७ (अरेरे! एवढ्याच ?). म्हणजे एका नोंदीला किमान तीस जणांनी भेटी दिल्या असं म्हटलं तर संख्या होते सतरा त्रिक चोपन्न-नव्हे-एक्कावन वर एक शून्य = ५१०. आणि आधीच्या काउंटर ने ५०० चा आकडा क्रॉस केलेला नक्की आठवतोय. सो आता हा काउंटर ५१० पासूनच सुरू करतो.

5 comments:

 1. Stats shows by this counter are useless. try to use google analytics it is best.

  for further support mail me - amolkumars{at}gmail{dot}com

  ReplyDelete
 2. लय भारी पोस्ट आहेत राव तुमच्या...
  आवडल्या आपल्याला... विज़िट करा:
  http://satyashodhak.wordpress.com

  ReplyDelete
 3. HTML च्या थोड्याफार माहितीवरून त्या कोड मधे काडी करून ती लिंक मी काढून टाकली... हा हा...
  नव्या काउंटर साठी शुभेच्छा... :)

  ReplyDelete
 4. @ मराठा
  धन्यवाद. 'पोस्ट्स आवडल्या' हे वाचायला खूपच सुखद वाटतय. :)

  ReplyDelete
 5. @ गजानन
  आपल्या शुभेच्छा लागू पडल्या. पहिल्याच दिवशी ५१० वरुन ६३३ !
  थॅंक्स :)

  ReplyDelete