
सॉलिड बातमी होती आज सगळ्या पेपरांत. BCCI च्या 'कारणे दाखवा' नोटीसला मोदी यांनी बारा हजार पानी उत्तर दिले. खरंच अचाट ईसम आहे हा मोदी ! ३५ पानांच्या नोटीसला एवढं मोठं उत्तर ? इकडे मराठीच्या तासाला संदर्भासाहित स्पष्टीकरणाला १०-१२ ओळी लिहिताना आमची बोंबाबोंब व्हायची अन् हे बेणं पाठवतंय खोकिच्या खोकी भरून उत्तर !
आता केकता कपूर--सॉरी--एकता कपूरला नवीन सीरियल सुरू करण्याची नामी संधी आहे. 'कहानी क्रिकेट किंग की' (यातल्या क्रिकेटचं स्पेलिंग 'Kricket' बरं का) या नावाने सीरियल जाहीर करायची आणि त्यात ललित मोदींची 'छोटिशी' मुलाखत घ्यायची. १२००० हजार पानी उत्तरं देण्याची सवय असणार्या मोदींची ती मुलाखत रोज डेली सोपच्या धर्तीवर दाखवल्यास किती दिवस सुरू राहील याचा हिशोब करा !
बाकी ते उत्तर खरंच एवढं मोठं नसणार. मजकुराची लांबी वाढवायची ती जुनीच आयडिया आहे. त्यात लिहिलं असेल, "आम्ही बॉल खरेदी केले. त्याची क्वालिटी तपासण्यासाठी त्याचे टप्पे पाडून पाहिले. टप्पे असे पडले--टप टप टप टप....टप टप टप टप.....टप टप टप टप.....टप टप टप टप.....एन्"
बरोबर ना ?
:)
ReplyDeleteहा हा हा ...
ReplyDeleteया बातमीत अजुन एक गंमत म्हणजे - शंकर मनोहर यांना एका मिनिटाला हजार पाने वाचण्याचा अनुभव आहे म्हणे. कस शक्य आहे हे?
ReplyDelete@ davbindu
ReplyDeleteThanks :)
@ सोहम
ReplyDeleteधन्स :)
@ Sarika
ReplyDeleteहो...मोदींचे वकील म्हणतात तसं.
त्या शशांक मनोहरना मोदींच्या या (काल्पनिक) सीरियल मध्ये नाही घेतलं म्हणजे मिळवली....नाहीतर एका दिवसात संपायचा शो ;)
He..he...!!!
ReplyDeleteMastach re...." Kshitij "...!!! ( Aani mala Maithili taai mhanu nakos...)
बीसीसीआयने मोघम आरोप केल्याने उत्तर इतके मोठे झाले असावे. मोघम आरोप करण्यामागे ललित मोदीनी मुख्य आरोपाना उत्तर दिले नाही असे भासविण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न होता. तो मोदीनी मोठे उत्तर देऊन त्यांच्या अंगलट आणण्याचा प्रयत्न केला आहे.
ReplyDelete@ अनामित
ReplyDeleteहोय. त्याबाबत मोदींची (त्यापेक्षा त्यांच्या वकिलांची) बुद्धी वाखाणण्याजोगी आहे.
टीप: पुढच्या वेळेस प्रतिक्रिया देताना नाव लिहिलेत तरी हरकत नाही. :)
@ Maithili
ReplyDeleteहो नक्की.