Sunday, 2 May 2010

चायनीज ??

स्थळ : मुंबईतला तसा कमी गर्दीचा बसस्टॉप.
वेळ : अशीच.....निवांत.
पात्रे : दोन मनुष्य.
मनुष्य क्रमांक एक : तुम्ही चायनीज आहात का हो ?
मनुष्य क्रमांक दोन : नाही. इथलाच आहे मी.

(थोड्या वेळाने)

मनुष्य क्रमांक एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
मनुष्य क्रमांक दोन : (त्रासून) सांगितल ना एकदा...नाही.

(परत थोड्या वेळाने)

म.क्र. एक : सांगा ना तुम्ही चायनीज आहात का ?
म.क्र. दोन : (रागावून) अहो काय हे.......नाहीए मी चायनीज किती वेळा सांगू ??

(परत अजुन थोड्या वेळाने)

म.क्र. एक : खरं सांगा.....चायनीज आहात ना ?
म.क्र. दोन : (किंचाळून) हो....आहे मी चायनीज. बोला....
म.क्र. एक : काहीतरीच सांगताय.....चायनीज म्हणे.....चेहे-यावरून अजिबात वाटत नाही !!

4 comments:

 1. Sahiye....
  Ha joke aani tumacha blog donhi...
  Sholey aani Kill Bill aflatoon hote..... :)

  ReplyDelete
 2. मन:पूर्वक आभार !
  आणि 'किल बिल' साठी जास्तच आभार. स्वत:चं क्रिएशन ना !

  ReplyDelete
 3. आणि 'तुम्ही' म्हणायची गरज नाही. मी तुमच्या पेक्षा एक वर्षाने लहान आहे.

  ReplyDelete